Tuesday 5 June 2018

शून्य कचरा संकल्पना



कामिकात्सू, जपान :
 एक कचरामुक्त गाव 

कामिकात्सू हे जपानमधील एक खास टाऊन आहे. तेथील चहाचे मळे आणि मोठमोठ्या पर्वतरांगा किवा ऐतिहासिक घरे  सोडले तर आणखी खास वेगळेपण या गावाने एका नसलेल्या गोष्टीसाठी  जपून ठेवले आहे. कामिकात्सू हे एक कचरा निर्माण न करणारे टाऊन म्हणून ओळखले जाते. जवळपास पाहिल्यास येथे कचऱ्याची निर्मितीच केली जात नाही.  

          
   कामिकात्सू या गावाची लोकसंख्या ही १५०० च्या आसपास आहे. कामिकात्सू हा एक ग्रामीण भाग असून येथील लोक टाकाऊ कचरा हा इंधन म्हणून जाळण्यासाठी किवा विघटन करण्यासाठी वापरत होते. कचरा जाळण्याने कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि ते पर्यावरणासाठी खरोखरच धोकादायक आहे हे येथील लोकांच्या नंतर लक्षात आले. आणि मग येथील लोकांनी शून्य कचरा निर्मितीस सुरुवात करून आयुष्य जगण्यास सुरुवात केली आहे. ही शून्य कचऱ्याच्या निर्मितीची संकल्पना येथे २००३ मध्येच सुरु झाली होती.  शून्य कचऱ्याच्या निर्मितीची संकल्पना म्हणजे अशा प्रकारच्या कोणत्याच गोष्टीची निर्मिती करायची नाही की जी कचऱ्यात फेकून देता येईल. प्रत्येक वस्तूचा पुनर्वापर हा केला गेलाच पाहिजे. आणि सुरुवातीला हेच काम सर्वांसाठी कठीण काम होऊन बसले होते.

            येथील 'तकूया तकेईची' यांचे येथे एक दुकान आहे. ते सांगतात की, जेव्हा शून्य कचरा संकल्पना येथे राबवली गेली होती, सुरुवातीला तेव्हा तो सगळा कचरा वेगवेगळा करणे हे फार डोकेदुखीचे आणि वेळखाऊ काम ठरले होते. आणि सौ.हाते कातायामा ज्या एक गृहिणी आहेत त्या सांगतात की, 'सुरुवातीला मी प्लास्टिक, लोखंडी वस्तू, कागद, वर्तमानपत्रे, रबर, अशा सगळ्या गोष्टी मी यार्डमध्ये कचरा समजून जाळून टाकायचे. परंतु नंतर काही परिस्थिती बदलत गेली आणि कचरा वर्गीकरणाची  पद्धत आली, आणि मी आणखीनच गोंधळात पडले.' परंतु हीच कचरा वर्गीकरणाची पद्धत 'कामिकात्सू' च्या आक्रमक यशाची किल्ली बनली. या कचरा वर्गीकरण पद्धतीमध्ये ४५ वर्गीकरणाच्या बाबी आहेत ज्यामध्ये कचरा विभागल्यानंतर त्याचा पुनर्वापर होऊ शकतो. अॅल्युमिनिअमचे  कॅन, स्टील कॅन, स्प्रे कॅन, धातूची झाकणे, कपडे, लाकडी
वस्तू, इलेक्ट्रिक दिवे, अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये येथील कचऱ्याचे वर्गीकरण केले जाऊ लागले. आणि हेच वर्गीकरण करणे येथील लोकांचे जीवनमान होऊन बसले आणि येथील लोकांचा कचऱ्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन होऊन बसला. येथील एका हॉटेलचे मालक सांगतात की, जेव्हा आम्ही काही वस्तू, पदार्थ, बाटल्या जेव्हा होलसेल मध्ये खरेदी करतो तेव्हाच आम्ही त्या वस्तूंचे खोके रिकामे करून ते चपटे करून साठवून ठेवतो की, ज्याने करून त्याचा पुनर्वापर करता येईल. ते सांगतात की सुरुवातीला आम्ही सगळ्याच वस्तू फेकून द्यायचो परंतु आता साधी प्लास्टिक ची पिशवी देखील आम्ही पाण्याने धुवून ठेवतो. आणि उरलेल्या खाण्याच्या पदार्थांचे आम्ही कंपोस्ट खात करून टाकतो त्याचा शेतामध्ये खात म्हणून पुनर्वापर होतो आणि भाजीपालाही उत्तमरीत्या तयार होतो मग तोच भाजीपाला आम्ही हॉटेलमध्ये वापरतो.

            या ठिकाणी हे लक्षात घेतले पाहिजे की कामिकात्सू हे एक छोटे टाऊन आहे. हे काही न्युयोर्क किवा लंडन सारखे नाही. येथे काही या इतर शहरांसारखे नियम नाहीत पण येथील लोकांनी स्वतःहून काही नियम स्वतःवर लादून घेतले आहेत. पुष्कळदा असे होते की सामाजिक समस्या सोडवण्यात आपण दुबळे होतो आणि हा प्रश्न सुटूच शकत नाही असे आपण म्हणतो. परंतु जर आपण मनाची तयारी केली, सामील झालेल्या लोकांचे मनोबल वाढवले तर सगळे शक्य होते. येथील सर्व लोकांनी ही शून्य कचऱ्याची कल्पना व्यास्थित पाने समजून घेतली आहे आणि या संकल्पनेचे महत्व त्यांच्या आयुष्यात त्यांना पटायला लागले आहे. पेपर, प्लास्टिकच्या बाटल्या, लोखंडी वस्तू, रबर, वायर, कपडा, पुठ्ठे, काच, अशा प्रकारच्या बऱ्याच वेगवेगळ्या विभागांमध्ये येथील वस्तूंचे  वर्गीकरण केले जाते. अगदीच
 साधी प्लास्टिकची पिण्याची बाटली जरी घेतली तरी येथील लोक त्या बाटलीचे झाकण, बाटलीच्या प्लास्टीकचा कागद, आणि बाटली अशा प्रकारच्या वेगवेगळ्या साठवणुकीच्या पिशव्यांमध्ये वर्गीकरण करतात त्यातही प्लास्टीकचे झाकण वेगळे आणि औषधाच्या बाटलीचे झाकण वेगळे. येथील लोकांनी घराच्या मागच्या बाजूस, गच्चीवर, अशा ठिकाणी वेगवेगळ्या मोठमोठ्या प्लास्टीकच्या ड्रम मध्ये प्लास्टिक ची मोठी पिशवी ठेऊन कचऱ्याचे(विविध वस्तूंचे) वर्गीकरण केले आहे. आणि या वस्तूंचे वर्गीकरण करण्यापूर्वी त्या वस्तू खराब  झालेल्या असतील तर त्या आधी धुवून घेतल्या जातात आणि मगच त्या साठवून भंगार वाल्याकडे पुनर्निर्मिती साठी दिल्या जातात.  आता कुठलीही गोष्ट कचऱ्यात  फेकून देण्यापूर्वी  येथील लोक विचार करायला लागले आहेत. येथील ८० टक्के कचऱ्याचा येथे पुनर्वापर आणि आणि कंपोस्ट करण्यात होत आहे थोडक्यात न होणाऱ्या कचऱ्याचे महत्व त्यांना समजले आहे. आणि २०२० पर्यंत त्यांचे १००% शून्य कचऱ्याचे लक्ष आहे.


            आपल्या भारतात मात्र तसे दिसत नाही येथील लोकांची कचऱ्याबद्दल फार वेगळी मानसिकता आहे. कचरा म्हणजे केवळ घाण, अशा प्रकारची घाण की, जी जर आपल्या घरात राहिली तर त्यापासून आपणास वेगवेगळ्या आजारांनी ग्रासले  जाईल आणि आपण आजारी पडू शकतो, अशा प्रकारची एक मनःस्थिती येथील लोकांची झाली आहे. त्यामुळे आपल्या देशातील लोकांना कचरा हा नकोसा झालाय. खरे तर स्वच्छता ही ठेवलीच पाहिजे पण ही स्वच्छता ठेवताना कचरा हा निर्माण नाही झाला पाहिजे, थोडक्यात आपल्या घरातील वस्तूंचे कचऱ्यात रुपांतरण नाही झाले पाहिजे. मग एव्हढा सगळा कचरा हा घरातच साठवून ठेवायचा का? असेही काही लोक विचारतील. तर त्यावर उत्तर आहे की, वर्गीकरण पद्धत. खरे तर महानगरपालिकेनेही जरी ओला कचरा आणि कोरडा कचरा अशी वर्गीकरणाची पद्धत आणली असली तरीही कोरडा कचरा निर्माण करणे आपण कमी करू शकतो.
            आता तुम्ही म्हणाल की, कसे काय निर्माण करायचा हा शून्य कचरा? तर आपल्या घरातील कचऱ्याचे मूळ हे खरेदी पासून सुरु होते. मग ती कपड्यांची असो, किवा घरातील किराणा, इतर शोभेच्या वस्तू, वर्तमानपत्रे, भाजीपाण्याच्या पिशव्या, कागदी डिश, ग्लास, थर्मोकोल, शीतपेयांच्या बाटल्या साधारणपणे अशा प्रकारच्या कोरड्या कचऱ्याचा यात समावेश असतो. आता या सर्व वस्तूंपासून कोरडा कचरा हा निर्माण कसा करायचा हा एक मोठा प्रश्न आहे. तर यावर उत्तर असे की, जेव्हा आपण किराणा विकत घेतो तेव्हा हा किराणा बरण्यामध्ये भरून ठेवताना ज्या काही प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्या आपण धुवून त्यांचा पुनर्वापर करू शकतो. अशा सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्या, छोटे प्लास्टीकचे कागद, आपण व्यवस्थित एका पिशवीमध्ये चपटे करून एकावर एक रचून ठेऊ शकतो फक्त लक्ष एवढेव ठेवायचे आहे ही त्या विश्व्या फाडताना त्यांचा नीट पुनर्वापर केला जाऊ शकतो अशा प्रकारे त्या फाडल्या गेल्या पाहिजे. तुम्हाला हवे असेल तर युटूबवर तुम्हाला बरेच काही व्हिडीओ या पिशव्यांच्या पुनर्वापराबद्दल मिळतील, सुदैवाने ती एक कृपा आपल्यावर युटूबने करून ठेवली आहे. राहिला प्रश्न खोक्याचा तर ही छोटीमोठी खोकी आपण चपटी करून ती एकावर एक रचून त्याची थप्पी करून भंगार वाल्याला विकू शकतो. राहिला प्रश्न बाटल्यांचा तर त्यात आपण छोटी छोटी रोपे उदा. पुदिना, कोथिंबीर, पालक यांसारखी रोपे लावू शकतो. या बाबतीतही तुम्ही गुगलची मदत घेऊ शकतात. एखाद्या वस्तूचा पुनार्वापर कसा करावा याबद्दल जर तुम्ही गुगल वर ईमेजेस जर सर्च केल्या तर तुम्हाला अनेक नवीन नवीन कल्पना सुचतील. फेसबुक आणि गुगल  वरही असे अनेक  पेजेस आहेत की जे तुम्हाला Handicraft, House Gardening, Garbage Reuse यांसारख्या विषयांबाबत मदत करतील. आणि ओल्या कचऱ्याच्या बाबतीत जर विचारायचे झालेच त्यापासून उत्तम कंपोस्ट खत आपण तयार करू शकतो, ज्यांना सोसायटी मध्ये जमत नसेल अशा लोकांनी बाल्कनी मध्ये कुंड्या ठेऊन त्यात माती  न घालता तो कचरा त्यातच सडून द्यावा मग त्याचे उत्तम  खत तयार झाल्यावर त्यावर एक इंच मातीचा थर देऊन त्यात त्यांना रोपे लावता येतील. मी तर विशेष करून पावसाळ्यात असा कचरा साठवून ठेवतो आणि जेव्हा पाऊस पडल्यानंतर छोटी मोठी गांडुळे अंगणात फिरतात तेव्हा ती काडीवर उचलून कुंड्यांमध्ये टाकून देतो. गांडूळ या प्रण्यामुळे कंपोस्ट खताचे लवकर विघटन होते. शिवाय रोपेही त्यामुळे जोमदारपणे वाढतात.  

कामिकात्सू  टाऊन , जपान 

            काही घरातील विशेषत: उच्चभ्रू-मध्यम घरातील, या घरातील काही गृहिणींना दुपारी काही काम नसते तेव्हा हे लोक दुपारी एक तर झोपा काढतात, शेजारी गप्पा मारायला जातात, किवा टीव्ही पाहत बसतात. त्यामुळे अशा वेळेस जर हे सगळे उद्योग थांबवून इंटरनेट वर जर कचरा संकलन व विलगीकरणाचे उद्योग सर्च केले तर एकटेपणा हा नक्कीच जाणवणार नाही. केवळ त्या Whatsup  वर करमणुकीचे व्हिडीओ किवा मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा आपल्या घराच्या आजूबाजूस चा कचरा साफ केला किवा थोडेफार बागकाम केले तर दिवसातील वेळ कसा निघून हेच कळत नाही. आणि त्यातल्या त्यातही जे लोक छंद जोपासणाऱ्या प्रवृत्तीचे किवा कलाकारी वृत्तीचे असतील तर असे लोक आयुष्यात कधीही कंटाळत नाहीत.
            थोडक्यात सांगायचे झालेच तर, शून्य कचरा राबवणे हे सोपे काम आहे, स्वतःपासून सुरुवात केली कर नक्कीच बदल घडणे अपेक्षित आहे. त्यामुळे आजच्या या पर्यावरणदिनी या शून्य कचऱ्याचे महत्व जरी आपणास पटले तर आजच्या या पर्यावरण दिनाच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात करण्यास हरकत नाही.

पुढील लिंक वर आपण कामिकात्सूच्या शून्य कचऱ्याच्या संकल्पनेचा व्हिडीओ पाहू शकता:


Friday 16 January 2015

वणी-नांदुरी येथे भरलेल्या आदिवासी जनतेची एकता परिषदेतील काही निवडक छायाचित्र प्रदर्शन

मयुरवृत्त प्रकाशनने नुकतीच प्रकाशित केलेली 'कोळवाडाया पुस्तकाची द्वितीय आवृत्ती व इतर पुस्तके

मयुरवृत्त प्रकाशनने नुकतीच प्रकाशित केलेली 'कोळवाडाया पुस्तकाची द्वितीय आवृत्ती व इतर पुस्तके 
डॉ. गोपाळ गवारी साहित्य संमेलनाच्या व्यवस्थापकांशी चर्चा करताना

आदिवासी स्त्री सहभाग

आदिवासी स्त्री सहभाग

आदिवासी नृत्य छायाचित्र 

आदिवासी साहित्यिक डॉ. गोपाळ गवारी वाचकांना पुस्तक परिचय करून देताना

मयुरवृत्त प्रकाशनने नुकतीच प्रकाशित केलेली 'कोळवाडाया पुस्तकाची द्वितीय आवृत्ती व इतर पुस्तके

मयुरवृत्त प्रकाशनने नुकतीच प्रकाशित केलेली 'कोळवाडाया पुस्तकाची द्वितीय आवृत्ती व इतर पुस्तके

आदिवासी छायाचित्र- आदिवासी जीवनशैली 
आदिवासी छायाचित्र- आदिवासी जीवनशैली

आदिवासी छायाचित्र- आदिवासी जीवनशैली

आदिवासी छायाचित्र- आदिवासी जीवनशैली

आदिवासी छायाचित्र- आदिवासी जीवनशैली

आदिवासी छायाचित्र- आदिवासी जीवनशैली

आदिवासी छायाचित्र- आदिवासी जीवनशैली

मयुरवृत्त प्रकाशन ग्रंथप्रदर्शन

वणी-नांदुरी येथे भरलेल्या आदिवासी जनतेची एकता परिषद २०१५


दि. १४ व १५ जानेवारी २०१५ रोजी नंदुरी ता. दिंडोरी,नाशिक. येथे आदिवासी एकता परिषदेचे सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. या निमित्ताने ३ ते ४ लाख आदिवासी बांधवांचा जनसागर लोटला होता. महाराष्ट्रातील आणि देशातील कानाकोपऱ्यातून आदिवासी बांधव जमले होते. परंपरेनुसार लोकनृत्य, लोकगीते ढोल वाद्यांच्या गजरात कार्यक्रमास सुरुवात झाली. या निमित्ताने आदिवासीमध्ये आत्मभान आणि चैतन्य जागृत झाल्याचे दिसले. आदिवासीच्या मुखावर आनंद ओसंडून वाहत होता. आदिवासी जागा झाल्याची जाणीव यानिमित्ताने झाली. आता आम्ही फक्त ‘आदिवासी’ या एकाच शब्दाने एकवटलेले आहोत याचा प्रत्यय आला. बाकीच्या समाजाने दिलेल्या खोट्या पदव्या जसे ‘वनवासी’, ‘गिरीजन’ शब्द त्यांनी गाडून टाकले. कुणी त्यांना ‘वनवासी’ म्हणू नये किंवा तसा शब्द प्रयोग कुणी करू नये असा एकमुखी आवाज त्यांच्या एकमुखी निनादला. ‘जय आदिवासी’ एव्हढा एकाच नारा गर्जत राहिला.

           एकता परिषदेत मानवतेचे दर्शन घडले. आदिवासी भगिनी नागलीच्या भाकरी करून आपल्या बांधवांना मोफत देत होत्या.(प्रस्थापित लोकांसारखे कुपन किंवा पैसे घेतले जात नव्हते बरे.) या शिवाय लोक विना पैसा पोटभर खिचडी खात होते. हजारो लोक जेवण करत होते, तृप्त होत होते.मात्र स्वयंपाक करणाऱ्याच्या मुखावर कोणताच थकवा जाणवत नव्हता.

         आदिवासी मुळात निरुपद्रवी आहे. त्याला जीवनाचे आत्मभान आहे. याचाच परिपाक की काय या आदिवासी कार्यक्रमास बंदोबास्तास आलेल्या पोलीस यंत्रणेवर कोणताही ताण जाणवत नव्हता. आदिवासी मंत्री आपल्या बांधवांचे शत्रू कसे असतील आणि आदिवासी बांधव आपल्या मंत्र्याला कोणताही दगा किंवा त्रास देणार नाहीत याची खात्री पोलीस यंत्रणेला चांगल्या पद्धतीने झाली त्यामुळे आदिवासी बांधव निरुपद्रवी आहेत हे एकदा अधोरेखित झाले. 
           येथे भरलेल्या आदिवासी एकता परिषदेच्या निमित्ताने अनेक आदिवासी साहित्यिकांनी आपले साहित्य स्वतःच प्रकाशित केल्याने तो आता छापायला लागला आहे. त्यावर चांगल्या पद्धतीने बोलायला लागला आहे. मोठ्या प्रमाणात आदिवासी लेखकांची पुस्तके प्रदर्शनात पाहवयास मिळाली. त्यात सर्वश्री डॉ. गोपाळ गवारी, डॉ. तुकाराम रोंगटे, वाहरू सोनावणे, नाजुबाई गावित, प्रा. अशोक बागुल अशा विविध लेखकांची पुस्तके लोकांनी मोठ्या आदरभावाने विकत घेऊन आपल्याच बांधवांच्या साहित्याचा, त्यांच्या विचाराचा गौरव केला कारण त्या साहित्यात समाजाचे दुख, त्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले आहेत. विशेष म्हणजे प्रकाशित पुस्तके कुठल्या प्रकाशनाने केलेली नसून लेखकांनी ती स्वतःच्या पायावर प्रकाशित केलेली आढळली.
           या परिषदेच्या निमित्ताने आदिवासी समाज एकनिश्चयाने एकत्रित झाला, त्यांच्यात आत्मभान निर्माण झालेले आहे. मी फक्त आदिवासी आहे. आणि आमचे जीवन मानवी मूल्यावर आधारलेले आहे. असा संदेश बाकीच्या समाजापर्यंत निश्चितपणे पोहोचला जाईल. आज आदिवासी स्त्री सर्वात जास्त कष्ट करते तिच्याकडे निसर्गदत्त शक्ती आहे. परंतु तिचे शोषण यापुढे होणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, तिचा सन्मान झाला पाहिजे अशा प्रकारचे विचार यानिमित्ताने प्रकट झाले.
           आदिवासीच्या योजना चांगल्या राबवल्या गेल्या पाहिजे. त्यांच्या वन्य जमिनी त्वरित नावावर झाल्या पाहिजे. योजना राबवणारा अधिकारी कर्तव्यानिष्ट स्वच्छ प्रतिमेचा, आदिवासी माणसांचा तिटकारा न करणारा, अभ्रष्ट असला तरच आदिवासीचा विकास होईल. कुपोषण, आरोग्य, शिक्षण, याकडे सरकारने गांभीर्याने विचार करून कृतीशील धोरण राबवले पाहिजे. अन्यथा नक्षलवाद, धर्मांतर, स्थलांतर, सामाजिक अशांतता असे अनेक प्रश्न वर डोके काढल्याशिवाय राहणार नाहीत. आदिवासीच्या ताटातील खिरापत सत्ताधीकाऱ्यानी वाटेल तशी वाटण्याचा अतातायीपणा करू नये, अन्यथा अनेक अनर्थ घडतील. असा गर्भित इशारा विचारवंतानी दिला आहे. आपण आपल्या लोकांना आता नाकारून चालणार नाही केवळ विशिष्ट जातींसाठी, मुठभर लोकांसाठी धोरण राबवून सत्ता चालवणे घातक ठरेल. कारण बाकीची असंख्य जनता उपेक्षित, वंचित आपण किती दिवस ठेवणार आहात, हा महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा सरकारने डोके ठिकाणावर ठेऊन कारभार करावा. कुणाचा रोष आपल्या अंगलट येतं कामा नये ही जाणीव सतत ठेवणे गरजेचे आहे. सर्वांचा विकास झाला तरच सामाजिक स्वास्थ्य व राज्य प्रगती करू शकेल यात शंका नाही.
           या कार्यक्रमास आदिवासी विकास मंत्री मा. विष्णू सावरा, माजी आ.वि. मंत्री मधुकरराव पिचड, खा.मा. हरिश्चंद्र चव्हाण, जीवा पांडू गावित, नरहरी झिरवळ, तसेच अनेक मान्यवर, संस्थांचे अधिकारी, शासकीय कर्मचारी, MSEBचे कर्मचारी विजय माळेकर, अॅड. किरण दोबाडे, व मयुरवृत्त प्रकाशनचे व्यवस्थापक अमोल गवारी, डॉ गोपाळ गवारी व इतर व्यवस्थापक उपस्थित होते. 

सौ.संगिता गवारी.
-संपादक, मयुरवृत्त प्रकाशन,
मखमलाबाद, नाशिक.